08/09/2026
🙏 गुरुपौर्णिमा २०२६ 🙏
श्री गणराज नृत्य कला निकेतन, ठाणे
दि. ६ सप्टेंबर2026
रविवारी सहयोग मंदिर हॉल, ठाणे येथे श्री गणराज नृत्य कला निकेतनचा गुरुपौर्णिमा सोहळा अतिशय सुंदर आणि आनंदी वातावरणात पार पडला. ❤️
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी श्री श्रीराम देव, आदरणीय गुरु महामहोपाध्याय डॉ. मंजिरी देव आणि तालमणी पं. मुकुंदराज देव यांची उपस्थिती लाभली आणि त्यामुळे हा दिवस आमच्यासाठी आणखीनच खास झाला. 🙏
कार्यक्रमात गुरु-शिष्य परंपरेचा एक अतिशय सुंदर क्षण अनुभवायला मिळाला.सौ मनाली देव यांनी आपल्या गुरु डॉ. मंजिरी देव आणि पं. मुकुंदराज देव यांचे पाद्यपूजन केले. आणि त्यानंतर सौ.मनाली देव यांच्या विद्यार्थिनींनी आपल्या गुरु नृत्यालंकार सौ मनाली देव यांचपाद्यपूजन केले.
गुरुंकडून मिळालेली कला, संस्कार आणि आशीर्वाद पुढच्या पिढीकडे अशाच प्रेमाने पोहोचताना पाहणं हा खरोखरच भावूक करणारा क्षण होता. ❤️
यानंतर विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सुंदर कथ्थक सादरीकरणं करून सगळ्यांची मनं जिंकली. 👏✨
गजझंपा – १५ मात्रा, अष्टमंगल – २२ मात्रा, शिखर – १७ मात्रा अशा विविध तालांमधील नृत्यरचना सादर करत विद्यार्थ्यांनी कथ्थकच्या लयकारी आणि बारकाव्यांची सुंदर झलक दाखवली.
आपल्या छोट्या विद्यार्थ्यांनी कृष्ण, विठ्ठल आणि शिव यांवरील नृत्यरचनांमधून निरागसता आणि भक्तीचा सुंदर संगम सादर केला. 🥰🙏
मनाली देव यांची ‘डगर चलत’ ही सुंदर ठुमरी, आणि त्याला पं. मुकुंदराज देवजींच्या गायनाची लाभलेली साथ हा कार्यक्रमातील खास क्षण ठरला. 🎶❤️
आणि मग रंगला एकदम वेगळा आणि भन्नाट प्रयोग — क्रिकेट सामन्यावर आधारित गतभाव! 🏏😄
कथ्थकच्या माध्यमातून क्रिकेट मॅच सादर करण्याची ही अनोखी कल्पना सगळ्यांनाच खूप आवडली.नृत्यालंकार प्रिया देव यांची रंगतदार कॉमेन्टरी रोहित देव आणि अवधूत घेवडेकर यांची दमदार तबला संगत आणि मिथिल गवाडे यांची हार्मोनियमवर सुंदर साथ यामुळे सादरीकरणाला आणखीनच रंगत आली. 👏🔥
संपूर्ण सभागृह हाऊसफुल्ल! ❤️
पालक, कुटुंबीय आणि विद्यार्थ्यांचा उत्साह, प्रत्येक सादरीकरणाला मिळणाऱ्या टाळ्या आणि भरभरून मिळालेलं प्रेम पाहून मन खरंच भरून आलं. 🥰👏
विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत, गुरुंचे आशीर्वाद आणि रसिकांचे प्रेम — यापेक्षा मोठी पावती आणखी काय असू शकते! 🙏❤️
गुरुचरणी मनःपूर्वक वंदन…
आणि या सुंदर दिवसाच्या आठवणी मनात कायम जपून ठेवूया! 🌸🙏
सर्वांचे मनापासून आभार! ❤️
#गुरुपौर्णिमा ManjiriDeo MukundrajDeo ShriShriramDeo KathakDance Thane GuruPuja India