जयस्वालला शिक्षा आणि जुरेलचे शतक
कोलंबो कसोटी सामन्याचा दुसरा दिवस मजेचा झाला. एकीकडे मैदानावर केलेल्या चुकीची शिक्षा सामना अधिकाऱ्यांनी यशस्वी जयस्वालला सुनावली तर दुसरीकडे ध्रुव जुरेलने सुंदर फलंदाजी करत दुसरे कसोटी शतक झळकावले. रिषभ पंत बरोबर जुरेलने केलेली शतकी भागीदारी भारतीय संघाची सामन्यावरील पकड मजबूत करून गेली. फलंदाजांनी ५०० धावांचा डोंगर ओलांडून दिल्यावर भारतीय वेगवान गोलंदाजांनी काही धक्के श्रीलंकन फलंदाजांना दिले ज्याने दुसऱ्या दिवशीचा खेळ स्मरणीय झाला.
Sunandan Lele
Freelance Sports Journalist and loving it...
24/08/2026
मदु नदीची बोट सफारी
गॉल कसोटी सामना संपल्यावर बेंटोटा गावी जाताना वाटेत मदु नदी लागते. या नदीचा पसारा मोठा आहे. मदु नदीत बोट सफारीला जाण्याचा अनुभव वेगळा होता. या नदीच्या पाक्षात ६० पेक्षा जस्त छोटी बेटं आहेत. यातील काही बेटांवर जाऊन वेगळे अनुभव घेता आले त्याची ही खास क्लीप.
संधीचा फायदा असा घ्यावा
देवदत्त पडिक्कलला शून्य आणि १ धवेवर जीवदान लाभले. पण लक्षात घ्या की मिळालेल्या संधीचा फायदा त्याने कसा घेतला. लागोपाठ दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावले त्याने. तेव्हढेच कौतुक असिथा फर्नांडोच्या दमल लावून केलेल्या वेगवान माऱ्याचे करायला लागेल. चांगली गो्ट अशी की ज्या खेळपट्टीचा इतिहास फक्त गोलंदाजांचे लाड करण्याचा आहे तिथे गोलंदाजांना जरा साथ लाभली आहे.
रवींद्र जडेजा तू कमाल आहेस
तो बोलत नाही त्याची कामगिरी बोलते. तो गाजावाजा करत नाही की सोश मिडीयावर पोस्ट टाकत नाही पण त्याच्या फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातून त्याची महती आपल्याला समजते. होय रवींद्र जडेजा भारतासाठी जातिवंत अष्टपैलू खेळाडू म्हणून चोख काम करत आला आहे. त्याला आपण योग्य मान देतो का त्याच्या कामगिरीची दखल घेतो का हा प्रश्न क्रिकेट रसिक म्हणून आपण आपल्याला विचारला पाहिजे.
खेळपट्टीचा इतिहास भीतीदायक.
जितकी मजा आनंद समाधान काही मैदानांवर कसोटी सामन्याचे वार्तांकन करताना मिळते तितकीच भिती काही मैदानांवर कसोटी सामना होणार म्हणल्यावर वाटते. गॉल मैदानाची खेळपट्टी फलंदाजांचे लाड करण्याबरोबर थोडी मदत गोलंदाजांनाही करत होती. म्हणून पहिल्या कसोटीत मजा आली. आता दुसरा कसोटी सामना कोलंबोच्या सिंहलीज स्पोर्टस् क्लबवर होणार आहे ज्याचा इतिहास फलंदाजांच्या तोंडाला पाणी सोडणारा तर गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवणारा आहे. का ते थोडी आकडेवारी मांडतो म्हणजे तुम्हांला अंदाज येईल.
मानव सुथारचा भेदक मारा
दिसायला सोपा वाटणाऱ्या कसोटी विजयाला हाती घ्यायला भारतीय संघाला ७७.४ षटकांचे कष्ट करावे लागले. कप्तान धनंजया डिसिल्वा आणि पहिल्या डावातील शतकवीर सोनल दिनुशाने भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम शेवटच्या दिवशी गाळायला लावला. उपहाराअगोदर धनंजया डिसिल्वा बाद झाला आणि उपहारानंतर सोनल दिनुशा. त्या नंतरच विजयाचा मार्ग खुला झाला. मानव सुथारने दुसऱ्या डावात अचूक मारा करून ५५धावांमध्ये ६ श्रीलंकन फलंदाजांना बाद करून विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. उपहारानंतर पाऊण तासात श्रीलंकेचा दुसरा डाव २०६ धावांवर संपवला गेला आणि भारतीय संघाला १६५ धावांचा विजय हाती लागला.
भारतीय संघाचा विजयाकडे प्रवास
श्रीलंकन गोलंदाजांनी कष्ट करून भारताचा दुसरा डाव १९३ धावांवर गुंडाळला आणि विजयासाठी ३७२ धावा काढायचे अत्यंत कठीण आव्हान यजमान संघासमोर उभे राहिले. फिरकीला मदत करणारी खेळपट्टी आणि मोठ्या धावसंख्येचे ओझे मनावर घेत श्रीलंकन फलंदाज दुसऱ्या डावात मैदानात उतरले. माफक प्रतिकार करणाऱ्या ४ फलंदाजांचा बचाव भेदण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. एकंदरीत भारतीय संघाचा कसोटी सामना जिंकण्याचा प्रवास चालू झाला आहे.
मधल्या फळीने किल्ला लढवला
तिसऱ्या दिवशीच्या पहिल्याच षटकात भारताचा डाव ४६२ धावांवर आटोपला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा निम्मा संघ बाद करून धमाल उडवली होती. संघ अडचणीत असताना निरोशन डिक्वेला (८०धावा) आणि सोनल दिनुशा ( १००धावा) धावून आले. दोघांनी सहाव्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी करून संघाच्या धावफलकाला आधार दिला. डिक्वेला बाद झाल्यावर सोनल दिनुशाने किल्ला लढवला. भारतीय फिरकी गोलंदाजांनी संयम राखत टिच्चून मारा करून श्रीलंकेचा डाव २८४ धावांवर संपला तेव्हा १७८ धावांची भक्कम आघाडी भारतीय संघाच्या हाती लागली.
श्रीलंकन फिरकीचा प्रभाव पडला.
गॉल शहरात झालेल्या पावसाने पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशीचा निम्मा खेळ वाया गेला. हातात आलेल्या खेळात दोनही संघांनी खेळाचे श्रेय एक अर्थाने विभागून घेतले. देवदत्त पडिक्कलने १६७ धावांची खेळी उभारून दुसऱ्या दिवशीही छाप पाडली. दुसऱ्या बाजूला श्रीलंकन फिरकी गोलंदाज केशरा नुवांथा आणि प्रबाथ जयसूर्याने मिळून ७ भारतीय फलंदाजांना बाद केल्याने भारतीय संघाला खूप मोठ्या धावसंख्येकडे वेगाने जाण्यापासून रोखले.
बांगलादेश संघाचे तोंड भरून कौतुक
ऑस्ट्रेलियन पूर्ण ताकदवान संघाला त्यांच्या देशात जाऊन कसोटी सामन्यात पराभूत करायचा पराक्रम बांगलादेश संघाने करून दाखवला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक. दुसरीकडे ऑसी संघातील ज्येष्ठ खेळाडूंची जागा घ्यायला तरुण खेळाडूंचा समर्थ पर्याय पुढील काळात दिसत नाहीत याची काळजी वाटते आहे.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Pune
411029