And Universe
स्वतःचे पालकत्व आणि ब्रम्हांड
(सर्वांसाठी)
*कोर्स Online Zoom वर असेल.*
#ऑगस्ट 2026
#शनिरविबॅच
1,2 (Mind)
8,9
15,16 (Hooponopono)
22,23
एकूण 8 सेशन्स
16 तास प्रशिक्षण
सकाळी
🎯वेळ:10:30 am To 12:30 pm
फी: 10,000 रु.
*अभ्यास*
❇️मन आणि मेंदू
❇️आपल्या समस्यांची कारणं
❇️मनाचे रिप्रोग्रॅमिंग
❇️इनर चाईल्ड म्हणजे काय?
❇️स्वतःचे पालकत्व म्हणजे काय?
❇️हिलिंगचे मार्ग
❇️लाॅ ऑफ अट्रॅक्शन समज गैरसमज
❇️युनिवर्सचे मुख्य नियम
❇️आयुष्याची जवाबदारी
https://wa.me/919689124376
#कोर्स : नियम रजिस्ट्रेशन आधीच जरुर वाचा.
✅️ऑनलाइन सेशन असेल,व्हिडिओ कॅमेरा ऑन ठेवून प्रत्येक सेशन ला समोर हजर रहावं लागेल.
✅️*रजिस्ट्रेशनची घाई करु नका*
✅️*आधी तारखा आणि वेळेचं नेमकं नियोजन करा*
✅️*पात्रता : English आणि मराठी दोन्ही भाषा व्यवस्थित समजणं आवश्यक आहे*
✅️*कोर्सनंतर कोणत्याही प्रकारचे परत मार्गदर्शन केले जाणार नाही*
🙏*मानसिक समस्या/नैराश्य या सारख्या समस्या असणा-यांनी या अभ्यास-प्रशिक्षणासाठी येऊ नये अभ्यास विषयाचा ताण येऊ शकतो.
🙏 #प्रेग्नन्सी असेल तर प्रवेश नाही.
🙏ट्रेनर कोच,कंटेंट क्रिएटर असल्यास प्रवेश नाही.
©कांचन दीक्षित
रिपॅरेंटिंग : स्वतःचं पालकत्व
रिपॅरेंटिंग म्हणजे स्वतःच स्वतःचं पालकत्व घेणं स्वतःचे आई-वडील होणं!
एकदा आपलं पॅरेंटिंग झालेलं आहे जे आपल्या आई-वडिलांनी केलं,त्यादरम्यान काही उणिवा असतील किंवा पालकत्व लाभलं नसेल,काही जखमा असतील तर आता स्वतःची जबाबदारी घेऊन स्वतःच पालकत्व घेऊन आयुष्याला योग्य दिशा देणं म्हणजे रिपॅरेंटिंग!
©कांचन दीक्षित
https://whatsapp.com/channel/0029Vb82WMmBlHphJWHAIC11
Kanchan Dixit Time Management Training
ट्रेनर(Online Courses)
1)Time Management Course
2)Reparenting &Universe Course
लेखिका
https://amzn.eu/d/ipSdHmL
https://kanchandixit.com/
#ऑनलाईन कोर्स
#फक्त स्त्रियांसाठी
�आठवड्यातून दोन दिवस
*ध्येय कसं ठरवावं,कसं लिहावं?
*सवयींचं मानसशास्त्र आणि कायझेन
*नाती आणि वेळेचं नियोजन,
*घर आणि करिअर बॅलन्स
*स्वयंपाक आणि स्वच्छतेचं प्लॅनिंग
...या आणि अशा अनेक विषयांचा अभ्यास करण्याची सुरुवात करायची असेल तर हा एक छान कोर्स आहे
वेळेच्या नियोजनाच्या निमित्ताने आयुष्यात बदल घडवून आणायचा असेल तर हा कोर्स करुन कौशल्य शिकून घेता येई
#क्षमासाधना होओपोनोपोनो
(सर्वांसाठी वयोगट 18 ते 55)
*कोर्स Online Zoom वर असेल.*
#अभ्यास
क्षमा करणं म्हणजे काय?
क्षमा साधना कशी सुरु करावी?
होओपोनोपोनो समजून घेऊया.
#प्रेग्नन्सी असेल तर प्रवेश नाही.
ट्रेनर कोच कंटेंट क्रिएटर असल्यास प्रवेश नाही.
#जुलै2026
#शनिरविबॅच
18 आणि 19 जुलै
एकूण 2 सेशन्स
4 तास प्रशिक्षण
सकाळी
🎯वेळ:10:00 am To 12:00 pm
फी: 2,000 रु.
https://wa.me/919689124376
©कांचन दीक्षित
https://whatsapp.com/channel/0029Vb82WMmBlHphJWHAIC11
#न्यायअन्याय
#क्षमासाधना
काल क्षमा साधना सेशनमध्ये एक प्रश्न होता, माफ करणं म्हणजे सोडून देणं,अन्याय सहन करणं किंवा न्यायाची अपेक्षा सोडून देणं असा होतो का?
याचं उत्तर हे आहे की,
आपण दोन वेगळ्या गोष्टींमधे गोंधळ करत आहोत,
clarity Is Power!
एक आहे या जगातलं कोर्ट जिथे खरं खोटं मांडलं जातं क्वचित प्रसंगी लाच/वशिला चालतो साक्षीदार बदलले जातात खटला वर्षानुवर्ष चालतो मग स्वतःची बाजू मांडावी लागते एक स्टोरी सांगितली जाते मग त्या स्टोरीच्या बदल्यात प्रति स्टोरी असते आपण अनेक सिनेमे पाहिलेले आहेत आणि वास्तवातही अन्याय होताना दिसतो मग न्यायासाठी लढावं लागतं त्यासाठी अनेक वर्ष खर्च होतात आयुष्याची होळी होते साधारणपणे या जगात न्याय मिळवण्यासाठी हा संघर्ष आहे.
आता युनिव्हर्सचं सुद्धा एक कोर्ट आहे जे दिसत नाही आणि कोर्ट म्हटलं की,आपल्याला वाटतं की जसं आपलं इथलं कोर्ट तसंच ते असेल म्हणजे तिथे पण हीच पद्धत असेल.
चूक!
'दृश्यम' सारखे सिनेमे मनोरंजनासाठी असतात किंवा या जगासाठी असतात,युनिवर्सच्या अदृश्य कोर्टात चालाकीला जागाच नाही.
युनिव्हर्सचं कोर्ट फास्ट ट्रॅक आहे,युनिव्हर्सला एवढा मोठा पसारा सांभाळायचा आहे की,त्याला प्रत्येकाच्या केसेस अशा पद्धतीनं सुट्या सुट्या सोडवत बसायला वेळ नाही,त्याला इतर बरीच कामं आहेत,
एवढा टाइमपास करायला माणसांसारखं ते रिकामटेकडं नाही.
तिथे सन्नी पाजी स्टाईलनं न्याय होतो,
आज आत्ता ताबडतोब!😀
कारण युनिव्हर्स सिस्टीम नं काम करतं तिथे पैसा चालत नाही हुशारी चालत नाही वशिलेबाजी चालत नाही तिथे एक शिस्तबद्ध सिस्टीम आहे तिथे कायदा चालतो फक्त कायदा आणि तो इतका ॲक्युरेट आहे की कुणीच वाचू शकत नाही!
कुणीच म्हणजे अगदी कुणीच आणि तिथे पळून जाण्याची सटकण्याची शक्यता शून्य आहे.
आता हे कोर्ट काम कसं करतं ते पाहू,हे कोर्ट प्रत्येक क्षणाला तिथल्या तिथे न्याय करतं,तिथल्या तिथे निकाल लावतं,शिक्षा सुनावतं.
तिथे कोर्ट आणि ती व्यक्ती या दोघांमधे तिसरं कोणी नसतं,बाजू ऐकून घेणं वगैरे टाइमपास नसतो गुन्हा आणि गुन्ह्याची शिक्षा असा फॉरमॅट असतो तुम्ही शाहिद कपूरची रिल पाहिली असेल,
'सबका आपना रजिस्टर खुलेगा' म्हणजे मी मारलं कारण त्यानं मारलं असा टाइमपास करायला,कपटी चतुर माणसांची लबाड बुद्धी आणि त्यांनी रचलेली गोष्ट ऐकायला माणसं थोडी बसली आहेत वर!
एनर्जीचं जग आहे आणि एनर्जी cause and effect या तत्त्वावर काम करते.
दोघांनी एकमेकांना मारलं म्हणजे फिट्टमफाट झाली 😀असा कायदा तिथे नाही!
तो पोरखेळ आपल्याकडे चालतो तिकडं नाही!😀
तिकडे 'जो मारेल त्याला शिक्षा' असा न्याय होतो,
सिस्टीम काम करते तिकडे स्टोरी नाही.
त्यामुळे प्रत्येक जण आपलं रजिस्टर घेऊन नोंदी करत फिरतो आहे!
मला हे रहस्य कळल्यावर मला आता कोणाचाही सूड घ्यावासा वाटत नाही कारण न्याय फिक्स आहे,होणारच आहे,मी वेगळा जोर लावायची गरज नाही मला त्यासाठी काहीही प्रयत्न करायचे नाहीयेत मला ज्यांनी दुःख दिलेलं आहे त्यांनी स्वतःचं दुःख स्वतः च त्यांच्या रजिस्टर मधे लिहून टाकलेलं आहे,
आता प्रश्न माझ्या रजिस्टर चा उरतो, आता मी काय करेन त्याचं फळ मला मिळेल आणि ते माझ्या हातात आहे ते मी वेगळं लिहू शकते ही आहे क्षमा साधना हे आहे सोडून देणं!
या जगाच्या कोर्टात सोडून द्या असं म्हणत नाहीये क्षमा साधना त्या युनिवर्सच्या कोर्टाचा विषय आहे, म्हणून गल्लत करू नका दोन वेगळे विषय आहेत माफ करायचं म्हणजे इकडच्या कोर्टातली केस मागे घ्यायची आणि शत्रूशी मैत्री करायची असा होत नाही!
इकडे चाललाय तो खेळ तसाच चालू द्यायचा पण युनिव्हर्सच्या कोर्टाचं पण भान ठेवायचं कारण एकाच वेळी दोन्हीकडे केस सुरू आहे.
तिकडची शिक्षा या जगात फलित व्हायला वेळ लागतो पण निकाल ताबडतोब लागलेला असतो.
इथे एका टाईमफ्रेम मधे आपण घटनाक्रम लावत असतो त्यामुळे आपल्याला न्याय आणि निकाल दिसतो पण त्या जगात टाईमफ्रेम नाहीये म्हणून आपल्याला अन्याय झाल्यासारखा वाटतो.
तिकडच्या जगाचे कायदे वेगळे आहेत तिकडे सिस्टीम वेगळी आहे,आपण कदाचित इथल्या जगात हारु पण तिकडे जिंकू!
✅️आपलं रजिस्टर सांभाळा.
✅️ न्याय होईल का नाही या संशयात वेळ वाया घालवू नका तो होणारच आहे.
✅️ दुःखाच्या बदल्यात समोरच्याला दुःख काय देऊ?कसं देऊ? यात स्वतःचं रजिस्टर भरून घेऊ नका.
✅️ पहिलं भरलेलं रजिस्टर घेऊन क्लियर करायला आलोय,अजून दुसरं कर्ज घेऊन जायचं नाहीये😀
✅️ तुम्ही मनानं क्षमा केल्यानंतर व्यक्ती सुटली असं नाही,युनिव्हर्स आणि ती व्यक्ती बघून घेईल.
✅️ या जगाची जी सिस्टीम आहे ती पाळा पण तो एक ड्रामा आहे एवढंच!
©कांचन दीक्षित
11/07/2026
*ऑनलाइन रेपॅरेंटिंग कोर्स करायचा असेल तर वाचा*
हा कोर्स डिझाईन करतानाच मला या विषयाची खोली आणि आवाका किती मोठा आहे याची जाणिव होती म्हणून संपुर्ण महिना एक बॅच घेतेय.
खरंतर 16 तासांचा हा अभ्यासक्रम एका आठवड्यात संपवून महिनाभरात चार बॅचेस होऊ शकतात या हिशोबानं भरपूर फी ही कमवता येईल पण असे विषय किंवा अशा स्वरूपाचं ट्रेनिंग म्हणजे एखादी वस्तू नाही उलट जवाबदारी आहे जी मला योग्य व्यक्तीला योग्य पध्दतीनं सोपवायची असते.
संपुर्ण महिनाभर माझ्यासाठी पण हा एक थकवणारा अनुभव असतो,मलाही ब्रेक आणि विश्रांतीची गरज असते एका आठवड्यात चार तास म्हणजे दोन तासाचे दोन सेशन्स शिकवल्यानंतर पाच-सहा दिवसांचा ब्रेक मुद्दाम ठेवण्यात आलेला आहे जेणेकरून ऐकलेलं समजून घेतलेलं पचेल,नीट समजेल.
दोन सेशन्स झाल्यानंतर जे शिकवलं त्या विषयाशी संबंधित युट्युब व्हिडिओज मी पाठवते जे तुमच्या सोयीनं कधीही कुठेही पहाता येतात ज्यामुळे जे शिकलो त्याची रिविजन होते,एकच विषय वेगवेगळ्या लोकांच्या आवाजात ऐकल्यानं मन विस्तारतं आणि विषय नीट समजतो.
इनर वर्क म्हणजे 'स्वतःवर काम करणं' हा एक अध्यात्मिक प्रवास आहे,हा प्रवास कसा करायचा हे मी या कोर्समध्ये शिकवते.
सेल्फ स्टडी म्हणजे स्वतःच अभ्यास करून वेगवेगळे विषय समजून घेणं,याची सवय झाली की पुढे तुम्हाला तुमचे मार्ग सुचत जातील,सापडत जातील यावर माझा विश्वास आहे.
साधारणपणे सवयी बदलण्यासाठी 21 दिवस स्वतःवर काम करावं लागतं मेंदू मधल्या न्यूरोंस चे पाथवे एक महिनाभरात तयार होतात म्हणून हा कोर्स संपुर्ण महिना असतो.
कोर्सला नाव नोंदणी करण्याआधी स्वतःचं वेळापत्रक तपासा,घाई करू नका,नंतर रेकाॅर्डिंग मुद्दाम देत नाही,100% हजर रहावं लागतं.
घरातल्यांना कुटुंबियांना कोर्सची कल्पना द्या जेणेकरून तुमच्यासाठी सपोर्ट तयार होईल,बऱ्यापैकी फ्री असाल असा महिना निवडा.
घाईघाईत गडबडीत करण्याचा हा कोर्स नाही,या कोर्सचं कोणतंही सर्टिफिकेट नाही जे तुमच्या फाईल मध्ये ऍड होईल.
स्वतःबद्दल अवेअरनेस येणं ही हिलिंग ची सुरुवात असते ज्यामुळे मानसिक भावनिक दृष्ट्या थकवा जाणवू शकतो,पुरेशी झोप मिळेल याची संपूर्ण महिनाभर काळजी घ्यायची आहे,कोर्स दरम्यान काही लेखन कृती किंवा मेडिटेशन,आत्मपरीक्षण, व्हिडिओ पहाणं असा अभ्यास असेल,तो करण्यासाठी आठवड्यातून किमान एक तास तरी वेळ बाजूला काढावा लागेल जेणेकरून कोर्सचा जास्तीत जास्त फायदा होईल.
मला कोर्सचे रिझल्ट्स हवे आहेत त्यामुळे मोजकी पण मनापासून या विषयाचं महत्त्व जाणणारी अभ्यासू जिज्ञासू मंडळी बॅचमध्ये एकत्र यावीत असा माझा प्रयत्न असतो.
पर्सनली हा कोर्स करा म्हणून मी कुणालाही सेल्स मार्केटिंग पद्धतीनं समजावत नाही,कारण ज्याला या विषयाची माहिती आहे त्याला काहीच पटवून द्यायची गरज नसते,वेळ असते,योग्य वेळ आल्यावर कुणी काय निवडायचं हे ज्याचं त्याला बरोबर समजतं,हे कोणी सांगायची गरज नसते. त्यामुळे कोर्स का करावा,कोर्स करण्याची काही गरज आहे का?असं कुणी विचारलं तर मी म्हणते," मुळीच नाही,वाटलं तर करा"😄
©कांचन दीक्षित
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the business
Website
Address
Pune