10/08/2026
आज आईचा वाढदिवस… ❤️
११ ऑगस्ट १९४६ — तुझा जन्मदिवस.
आणि १५ ऑगस्ट २००९ — तू आम्हाला सोडून गेलीस.
दरवर्षी ११ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट हा प्रवास मनाला खूप काही आठवून देतो…
आम्हाला घडवण्यासाठी तू घेतलेली मेहनत,
आमच्यासाठी खाल्लेल्या खस्ता,
आणि तुझ्या आयुष्यात **आम्हीच तुझी पहिली Priority होतो**,
हे आज अधिक प्रकर्षाने जाणवतं.
विशेषतः माझ्या वक्तृत्वावर तू घेतलेली मेहनत…
त्याची आठवण मला होत नाही, असा एकही दिवस जात नाही.
आजही प्रत्येक ट्रेनिंगची सांगता आम्ही कृतज्ञता व्यक्त करून करतो.
आणि त्या कृतज्ञतेमध्ये **पहिला मान, पहिलं स्थान — कायम फक्त तुझंच असतं, आई.** ❤️
आज मी जे काही आहे, त्यामध्ये तुझा वाटा शब्दांत मांडणं शक्यच नाही.
**Thank you so much for everything, Aai.**
तू नाहीस… पण तुझे संस्कार, तुझी शिकवण आणि तुझं प्रेम माझ्यासोबत प्रत्येक क्षणी आहे.
आज तुझ्या आणि माझ्यातलं वयाचं अंतर जवळपास **७० टक्क्यांनी कमी झालंय…**
पण जसजसं ते अंतर कमी होत गेलं, तसतशी **माझ्या मनातली तुझी उंची मात्र ७०० पटीने वाढत गेली.** ❤️🙏
**तुझ्या सुंदर आठवणींना उजाळा, आई. ❤️**