एच जी एस क्रिडा मंडळ

एच जी एस क्रिडा मंडळ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from एच जी एस क्रिडा मंडळ, Sports Club, सीताराम जाधव मार्ग, Mumbai.

HGS Sports Club under which many of activities starting from art, sports and Cultural rituals takes place
Kabbadi
Ganesh Utsav
Dahihandi
Sai Bhandara
and many more activities

20/08/2026

जुनी आठवण… पण उत्साह आजही तितकाच! ❤️🔥

कोविडनंतर पुन्हा रंगलेल्या दहीहंडीच्या उत्सवात HGS Boys सोबत मुंबईचे माजी महापौर श्री महादेवजी देवळे सहभागी झाल्याचा हा खास क्षण! 🥁

तोच जल्लोष, तोच उत्साह आणि दहीहंडी उत्सवाची तीच धमाल! ❤️
लवकरच ५ सप्टेंबर

तुम्हालाही ही आठवण आहे का? 😊
मित्रांसोबत शेअर करा!

OldMemories

15/08/2026

लोअर परळचा विघ्नहर्ता रथ 🙏😍

13/08/2026

15/06/2026
एच. जी. एस. हनुमान मंदिर, महाशिवरात्री 🙏✨क्रेडिट: सिद्धार्थ अजित जाधव.
16/02/2026

एच. जी. एस. हनुमान मंदिर, महाशिवरात्री 🙏✨

क्रेडिट: सिद्धार्थ अजित जाधव.

एच. जी. एस. क्रीडा मंडळ, हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने १४ वर्षांखालील मु...
15/02/2026

एच. जी. एस. क्रीडा मंडळ, हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने १४ वर्षांखालील मुलांसाठी भव्य कबड्डी स्पर्धा.

भगवा चषक २०२६

गुरुवार, १२ फेब्रुवारी ते रविवार, १५ फेब्रुवारी २०२६

दिवस शेवटचा…यशस्वी समारोपाचा…

रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ – हा दिवस फक्त एका स्पर्धेची सांगता नव्हती, तर कबड्डीच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात होती.

उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचा चुरशीचा सामना

• उपांत्य फेरी १
रणझुंजार क्रीडा मंडळ (विजेते) vs जय भारत क्रीडा मंडळ

• उपांत्य फेरी २
गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब (विजेते) vs संस्कृती प्रतिष्ठान

• प्रेक्षणीय सामना
एच. जी. एस. क्रीडा मंडळ (विजेते) vs वीर संताजी क्रीडा मंडळ
(आमच्या मुलांनी घरच्या मैदानावर एच. जी. एस. क्रीडा मंडळाचं भविष्य उज्वल असल्याचं दाखवून दिलं आणि ६० वर्षांच्या प्रवासाला विजयी सलामी दिली)

• अंतिम सामना : भगवा चषक २०२६ चे विजेते गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब, ना. म. जोशी मार्ग

उपविजेते : रणझुंजार क्रीडा मंडळ, लालबाग

याप्रसंगी विधानपरिषद आमदार माननीय श्री. सुनील शिंदे, युवासेना उपसचिव संदीप वरखडे, समाजसेवक बाळाशेठ खोपडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

आज १४ वर्षांखालील मुलांचा विजय झाला…

ज्यांच्या डोळ्यात स्वप्नं, हातात जोश आणि हृदयात कबड्डीची अमर परंपरा आहे.
त्यांच्या प्रत्येक चढाईत आम्ही भविष्य पाहिलं – एक अशी पिढी जी कबड्डीला नव्या उंचीवर नेईल.

हे फक्त एक चषक नव्हता...
हे आमच्या कुटुंबाचं एकत्र येणं होतं,
हे आमच्या हितचिंतकांचं, कार्यकर्त्यांचं, पालकांचं आणि प्रेक्षकांचं प्रेम होतं.
सर्वांना... खूप खूप मनापासून धन्यवाद!
तुम्ही नसता तर हे स्वप्न पूर्ण झालं नसतं.
आता पुढे...
हे छोटे खेळाडू मोठे होतील,
मैदानावर नव्या झेंड्यांसह उभे राहतील,
आणि कबड्डीचा झेंडा अधिक उंच फडकवतील.
आम्ही फक्त सुरुवात पाहिली आहे...
खरी गाथा येणाऱ्या काळात लिहिली जाईल.
जय हनुमान... जय महाराष्ट्र... जय कबड्डी... जय HGS!
६० वर्ष पूर्ण... आणि नव्या ६० वर्षांची सुरुवात! 🚩💛🔥

#भगवाचषक२०२६ #मुंबई_कबड्डी #हिरकमोहत्सव #लोअरपरळ_कब्बडी

Address

सीताराम जाधव मार्ग
Mumbai
400013

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when एच जी एस क्रिडा मंडळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category