एक स्वप्न पाच जणांनी बघितलेलं आणि २००+ जणांनी घडवलेले.. पाच तरुण तुमच्या आमच्या सारखे एकत्र याव काहीतरी कराव हा ध्यास त्यांना जडला. मोठ काही नाही पण जेथे राहतो तेथिल तरुणांना सांघिक खेळांची आणि आपल्या संस्कुतीची जाणं राहावी म्हणून २०१० साली शिवसंग्राम प्रतिष्ठान स्थापन झाले.ध्येय अगदी साध सरळ सोपं.. सांघिक खेळांसाठी तरुणांना एकत्र करायचं, पण आर्थिक पाठबळ उपलब्ध नव्हते, म्हणून दहीहंडी पासून सुरवात करावी अस ठरलं. कारण दोन होती, एकतर जास्तीत जास्त तरुणांना एकत्र आनता ऐईल आणि आर्थिक पाठबळ हि आपसूक मिळेल.
खरतर आजकाल तरुणांना एकत्र जमवण तस शक्य नाही पण आमच्या सारखे अजून काही डोक्यात खूळ असलेले भेटले आणि आज ५ जणांनी बघितलेले स्वप्न २०० पेक्षा अधिक तरुण बघत आहेत. तस म्हणाव तर हि खरी सुरवात आहे. अजून खूप काही करायचं आहे. कब्बडी, खोखो अशा खेळांचे संघ विभागीय नाहीत तर राज्यस्तरीय सामन्यांपर्यंत खेळवायचे आहेत.
जिद्द आणि चिकाटी, झोकून देण्याची वृत्ती हाच आमचा ठेवा आहे. आज हे रोपट जरी लहान असल तरी त्याचा वटवृक्ष होणार हे मात्र नक्की.