25/05/2026
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय “लंगडी महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२६-२७ – फ्युचर लंगडी क्वीन” स्पर्धेचे उत्साहात आयोजन
हिंगोली : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पारंपरिक भारतीय खेळांना आधुनिक आणि व्यावसायिक स्वरूप देण्याच्या उद्देशाने “प्रथम लंगडी महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२६-२७ – फ्युचर लंगडी क्वीन” या राज्यस्तरीय महिला लंगडी स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
ही स्पर्धा दिनांक २३ ते २४ मे २०२६ दरम्यान सनराईज इंग्लिश स्कूल, कांडली, ता. कळमनुरी, जि. हिंगोली येथे पार पडली.
या स्पर्धेला स्पोर्टराईज वर्ल्ड स्पोर्ट्स डेव्हलपमेंट अँड इंटरनॅशनल पार्टिसिपेशन फाउंडेशन (SWSDIPF) यांचे सहकार्य लाभले असून स्पर्धेचे आयोजन हिंगोली जिल्हा लंगडी असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक : सनराईज इंग्लिश स्कूल – आर. एफ. सर
कार्यक्रमाचे संयोजक : रेणुकाबाई संस्कृती क्रीडा मंडळ, रणवीर नामदेव सर तसेच हिंगोली जिल्हा लंगडी असोसिएशन 💐💐
महिला खेळाडूंना प्रोत्साहन देणे, पारंपरिक खेळांना व्यावसायिक स्वरूप मिळवून देणे आणि ग्रामीण भागातील प्रतिभेला मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता. स्पर्धेमुळे महिला खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध भागांतील आठ फ्रँचायझी संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये :
• हिंगोली रायडर्स
• पूर्णा टायगर्स
• परभणी सुपरस्टार्स
• कांडली लायन्स
• मालेगाव डायमंड्स
• लातूर गोल्डन्स
• शिवाजी वॉरियर्स
• डेक्कन स्ट्रायकर्स
या संघांचा समावेश होता.
महिला खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला :
🥇 प्रथम : पूर्णा टायगर्स
🥈 द्वितीय : परभणी सुपरस्टार्स
🥉 तृतीय : मालेगाव डायमंड्स
४ था : हिंगोली रायडर्स
५ वा : लातूर गोल्डन्स
६ वा : कांडली लायन्स
स्पर्धेसाठी आकर्षक ट्रॉफी व रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली होती. या स्पर्धेमुळे राज्यातील महिला लंगडी खेळाडूंना नवीन व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अरेफ सर, अध्यक्ष, सनराईज स्कूल, चेतन पागावाड, सचिव, लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तसेच सज्जन जयराजवाल, नरेंद्र जयस्वाल, दोतरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच आ. आकाश भोठीकर, डॉ. संजय खिल्लारे, रत्नाकर महाजन, हर्षवर्धन परसावळे, डॉ. संजय नाकोडे, संतोष कोल्हे, पंडित थोरात, यू. जे. नरवाडे, चंद्रकांत पानपट्टे सर, सुदर्शन करंडे सर, मनोज शेलगावकर आणि रणराव साळुंखे यांची उपस्थिती लाभली.
“खेळातून घडते सक्षम स्त्री – जिद्द आमची ओळख!” या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा महिला सक्षमीकरण आणि पारंपरिक खेळांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
04/01/2026
27/12/2025