20/03/2026
गिरीविराजची 223 वी मोहिम नुकतेच (१४/१५ मार्च २०२६) जुन्नर - आंबोली (दाऱ्याघाट) येथील " रिठ्याची लिंगी" नामक सुळक्यावर एका नवीनच मार्गाने चढाई करून यशस्वी झाली, सुळक्यावर चढाईसाठी पारंपारीक सोपा मार्ग असूनही संस्थेने आपल्या परंपरेला अनुसरून नवीन मार्गानेच माथा गाठला हे विशेष..
शुक्रवारी रात्री डोंबिवली व पुण्यातून निघून 7 जणांची टीम आंबोली गावात पहाटे भेटली. सुळक्याच्या पायथ्यास असणाऱ्या एका शेतात चार तंबू लावून सेटअप - चहानाश्ता आदि उरकून गणरायाला साकडं घालून दुपारी दोन वाजता टीम बेसकॅम्प वरून निघून प्रत्यक्ष चढाईस प्रदिपला सुरुवात करण्यास चार वाजलेच. पहिल्याच दिवशी चार बोल्ट वापरून त्याने सुमारे चाळीसेक फूट चढाई केली..
दुसऱ्या दिवशी सकाळी तीन जण पुण्यास परतले.. कमलाकर बेस कॅम्पवर तर किरण - प्रदीप - सूरज चढाईस निघाले.. पावणे बारा वाजता सहासष्ट वर्षीय किरण ने प्रत्यक्ष चढाई सुरू केली. प्रदीपच्या साथीने २ बोल्ट, ४ पिटोन, १ पेग वापरत तीसेक फूट चढाई करीत त्याने प्रदीपला पुढील चढाईसाठी पाचारण केले.. प्रदीपने पुढील चढाई करीत १ बोल्ट , १ पिटोन ,३ फ्रेंड ही साधने वापरत दुपारी ठीक ४ वाजून १४ मिनिटांनी माथा गाठून अजून एक मोहीम यशस्वी केली.. माथ्यावर वाइंडअप साठी एक बोल्ट ठोकण्यास आला..
प्रदीप म्हात्रेच्या नेतृत्वाखाली ह्या मोहिमेत किरण अडफडकर, अमर दरेकर, सूरज भंडारे, कमलाकर सावंत, समर्थ कोल्हे, सर्वेश कोल्हे आदी सहभागी झाले होते..
एकूण ८ बोल्ट, ५ पिटोन, ३ फ्रेंड व १ पेग ही साधने सदर चढाईत वापरण्यात आली, हे संस्थेचे ७० वे कृत्रिम आरोहण होते..
10/02/2026
Giriviraj Hikers recently conducted a Free Basic Rock Climbing & Safety Workshop at the historic Mumbra Nursery, with the aim of promoting safe trekking and mountaineering practices.
A total of 36 participants from different age groups attended the workshop. The response was overwhelming, with enthusiastic participation and excellent feedback from everyone involved. Participants learned essential basic climbing techniques, safety practices, knot-tying skills, and practised ascending , descending techniques using morden equipments which are crucial for safe trekking and mountaineering.
In recent years, the outdoor climbing culture at Mumbra Nursery has slowly declined, as many climbers have shifted to indoor gyms. At the same time, incidents of accidents during treks have increased due to lack of awareness, risky behavior, and misadventures such as taking selfies on exposed mountaintops or trekking without proper preparation.
Through this free workshop, Giriviraj Hikers aimed to revive the spirit of outdoor climbing while spreading the message that safety comes first in adventure. The program not only helped participants gain confidence and technical skills but also motivated many to return regularly to Mumbra Nursery for practice.
Giriviraj Hikers remains committed to saving lives, promoting responsible trekking, and building a safer mountaineering community through such awareness and training programs.
AdventureSafety ClimbingWorkshop
30/01/2026
गिरीविराजची २२२ वी मोहीम (६७ वी कृत्रिम चढाई मोहीम) नुकतेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत घुटके (लोणावळा) येथील एका सुळक्यावर नवीनच मार्गाने आरोहण करीत यशस्वी झाली. हे संस्थेचे २३ वे प्रजासत्ताक आरोहण होते हे विशेष !
शुक्रवारी रात्री डोंबिवली व पुणे येथून निघून पहाटे सर्वजण (लोणावळा) घुटके येथील मंदिरात भेटले. इथून जवळच असणारा पाळणा सुळके समूहाचा पायथा गाठण्यात आला. जवळपास पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे किरण-प्रदीप ने खूप शोधाशोध करून योग्य जागी खड्डा खणताच फुटभर खोलीचे पाणी लागले. राहिलेला दिवस सत्कारणी लागण्यासाठी मंडळी बेस कॅम्प वरून निघून क्रमांक चार च्या सुळक्याच्या पायथ्यास पोहोचली. गणरायास गाऱ्हाणं घालून प्रदीपने सेकंड मॅन किरण सोबत चढाई करीत ५० फुटापर्यंत मजल मारलीच त्या दिवशी. उर्वरित चढाई उद्या वर ठेवून सर्वांनी बेस कॅम्प गाठला. किरण-प्रदीप ने शोधलेले पाणी अजूनही गढूळच असल्यामुळे काही सहकारी घुटके गावात जाऊन पाणी घेऊन आले. जेवण-खाणं उरकत आजचा दिवस कसा संपला कळलं सुद्धा नाही.
दुसऱ्या दिवशी हितेशने अमरला साथीला घेत पुढील चढाई सुरू केली. मार्गात योग्य ती आयुधं वापरत दुपारी ठीक १२:४५ वाजता नवीनच मार्गाने माथागाठीत त्याने मोहीम फत्ते केली. त्याच्या पाठोपाठ टीम क्लाइंबिंग करताना तब्बल आठ जणांनी माथ्यावर प्रवेश करीत तिरंगा फडकवला. एकूण तीन एक्सपांशन बोल्ट, सहा फ्रेंड, तीन पिटॉन वापरून सदर चढाई पूर्ण झाली.
तिसऱ्या दिवशी क्रमांक एक सुळक्याची डावी बाजू चढाई करण्यासाठी सहकारी सज्ज झाले. अमरने सेकंड मॅन हितेश च्या मदतीने चार फ्रेंड, एक पिटॉन व एक पेग वापरत माथा गाठला. नंतर टीम क्लाइंबिंग करताना नऊ जणांनी माथा माथ्यावर हजेरी लावीत तिरंगा फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा केला. सदर मोहिमेचे ड्रोन शूटिंग हितेश साठवणे व अमोल दाते यांनी केले. जास्तीत-जास्त ज्युनिअर मेंबर्सनी चढून माथा गाठल्यामुळे संस्थेतर्फे ह्या रूटला “ज्युनिअर्स समिट” असे नाव देण्यात आले.
प्रदीप म्हात्रेच्या नेतृत्वाखाली सदर मोहिमेत किरण अडफडकर , हितेश साठवणे ,अमर दरेकर ,प्रवीण घुडे, सुरज भंडारे , अमोल दाते , मयुरेश घुडे , आदित्य देवधर ,योगेश इंगोले , प्रसाद शिंनगारे सहभागी झाले होते.
29/12/2025
गिरीविराज हायकर्स (डोंबिवली) ची 221 वि मोहिम नुकतेच हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरील "भवानीची धार "येथे आखण्यात आली होती. सन 2021 मधे रेखी करुनसुद्धा सहकाऱ्यांच्या अनुपस्थीतीमुळे मोहिम सतत लांबणीवर पडत होती. शेवटी काय व्हायचं ते होवो पण ह्या वर्षी मोहिम करायचीच हे ठरवून किरण, प्रदिप व विशाल तीघेच जण सर्व सामानानीशी रवीवारी (14 डिसेंबर 2025) पहाटे वाल्हीवरे येथील कमळू पोकळाच्या घरी दाखल झाले. मोरोशितील शिवराम त्यांना सकाळी जॉईन झाला. कमळूने दिलेली चार माणसं घेवुन एकूण आठ जणांची टिम पाठीवर पंचवीस किलोच्या सॅक लादून कोकणकडा बेस कॅपच्या दिशेने निघाली, ती दुपारी तीन वाजता इच्छीत स्थळी पोचली. सोबत आणलेली कमळूची चार माणसं परतली आणि पुन्हा चार जणच उरले. कड्याला चिकटूनच झाडीत दोन टेन्ट जागा साफ करून लावण्यात आले,कारण इथे सदैव रॉक फॉल होत असतो. बेसकॅप पासून डाव्या अंगाला कड्याच्याच पोटात असलेली पाण्याची जागा शोधून साफ सुफ करून त्यात लहानशी नळी बसवुन खाली 20 लीटरचा बाटला भरण्याची व्यवस्था करण्यात आली. इतकं करून होईतो आजचा दिवस संपला. अजून बरीच कामं झालीच नव्हती.
सोमवारी बेसकॅम्प- स्पोर्टिंग टिम – क्लाईम्बिंग अशा तिहेरी जबाबदाऱ्या पेलताना दुपारी टेंट बंद करून टिम कड्याच्या दिशेने (उजवीकडे) निघाली. वाटेत कड्यावर अवघड जागी शंभर फूट रोप फिक्स करण्यात आली. भवानी कड्याची पुजा करून गणरायाला साकड घालून दुपारी 2.34 वाजता विशाल ने चढाई सुरु केली.
सोमवार - मंगळवार दोन दिवसान त्याने सुमारे 375 फूट चढाई करण्यात यश मिळवले.
बुधवारी 65 वर्षीय किरणने लीड घेत सेकंड मेन प्रदिपच्या साथीने 2 bolt,4 पीटॉन, 2 फ्रेंड, 2 पेग ही साधने वापरून सुमारे 90 फूट चढाई केली.
बुधवारी अजून 2 मेंबर्स आले, आमची संख्या 6 झाली पण शुक्रवारी पुन्हा दोघे जण निघून जाणार होते त्यामुळे गुरुवार ची चढाई निर्णायक ठरणार होती.
गुरुवारी पुन्हा विशाल कड्याला भीडला,साथीला प्रदिप होता. दुपारी 3.20 वाजता विशालने सुमारे 600 फूट उंचीवरील आडवी चाल असलेली लेज गाठली, आणि इथेच चढाई थांबवून पुन्हा परत येवुन उर्वरित मोहिम पूर्ण करण्याचा निर्णय घेत मंडळी बसेकॅम्पवर परतली, कारण केवळ चारच माणसांमधे सहाशे फूट् कडा जुमारिंग करीत वर जाऊन पुढील चढाई सुरूच ठेवणे निव्वळ अशक्यच होते.
सोमवार ते गुरुवार अशा 4 दिवसात अंदाजे 600 फूट चढाई करताना
केवळ नऊ तासात (actual climbing hours) एकूण १० expansion बोल्ट्स, 11 फ्रेंड, 7 पिटोन, 2 पेग हि साधने वापरण्यात आली.
प्रदिप म्हात्रेच्या नेतृत्वाखाली किरण अडफडकर, अमर दरेकर, विशाल मोरे, शिवराम कवठे, सोमनाथ दरौडा सदर मोहिमेत सहभागी झाले होते.
26/12/2025
गिरीविराज हायकर्स (डोंबिवली) ची 221 वि मोहिम नुकतेच हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरील "भवानीची धार "येथे आखण्यात आली होती. सन 2021 मधे रेखी करुनसुद्धा सहकाऱ्यांच्या अनुपस्थीतीमुळे मोहिम सतत लांबणीवर पडत होती. शेवटी काय व्हायचं ते होवो पण ह्या वर्षी मोहिम करायचीच हे ठरवून किरण, प्रदिप व विशाल तीघेच जण सर्व सामानानीशी रवीवारी (14 डिसेंबर 2025) पहाटे वाल्हीवरे येथील कमळू पोकळाच्या घरी दाखल झाले. मोरोशितील शिवराम त्यांना सकाळी जॉईन झाला. कमळूने दिलेली चार माणसं घेवुन एकूण आठ जणांची टिम पाठीवर पंचवीस किलोच्या सॅक लादून कोकणकडा बेस कॅपच्या दिशेने निघाली, ती दुपारी तीन वाजता इच्छीत स्थळी पोचली. सोबत आणलेली कमळूची चार माणसं परतली आणि पुन्हा चार जणच उरले. कड्याला चिकटूनच झाडीत दोन टेन्ट जागा साफ करून लावण्यात आले,कारण इथे सदैव रॉक फॉल होत असतो. बेसकॅप पासून डाव्या अंगाला कड्याच्याच पोटात असलेली पाण्याची जागा शोधून साफ सुफ करून त्यात लहानशी नळी बसवुन खाली 20 लीटरचा बाटला भरण्याची व्यवस्था करण्यात आली. इतकं करून होईतो आजचा दिवस संपला. अजून बरीच कामं झालीच नव्हती.
सोमवारी बेसकॅम्प- स्पोर्टिंग टिम – क्लाईम्बिंग अशा तिहेरी जबाबदाऱ्या पेलताना दुपारी टेंट बंद करून टिम कड्याच्या दिशेने (उजवीकडे) निघाली. वाटेत कड्यावर अवघड जागी शंभर फूट रोप फिक्स करण्यात आली. भवानी कड्याची पुजा करून गणरायाला साकड घालून दुपारी 2.34 वाजता विशाल ने चढाई सुरु केली.
सोमवार - मंगळवार दोन दिवसान त्याने सुमारे 375 फूट चढाई करण्यात यश मिळवले.
बुधवारी 65 वर्षीय किरणने लीड घेत सेकंड मेन प्रदिपच्या साथीने 2 bolt,4 पीटॉन, 2 फ्रेंड, 2 पेग ही साधने वापरून सुमारे 90 फूट चढाई केली.
बुधवारी अजून 2 मेंबर्स आले, आमची संख्या 6 झाली पण शुक्रवारी पुन्हा दोघे जण निघून जाणार होते त्यामुळे गुरुवार ची चढाई निर्णायक ठरणार होती.
गुरुवारी पुन्हा विशाल कड्याला भीडला,साथीला प्रदिप होता. दुपारी 3.20 वाजता विशालने सुमारे 600 फूट उंचीवरील आडवी चाल असलेली लेज गाठली, आणि इथेच चढाई थांबवून पुन्हा परत येवुन उर्वरित मोहिम पूर्ण करण्याचा निर्णय घेत मंडळी बसेकॅम्पवर परतली, कारण केवळ चारच माणसांमधे सहाशे फूट् कडा जुमारिंग करीत वर जाऊन पुढील चढाई सुरूच ठेवणे निव्वळ अशक्यच होते.
सोमवार ते गुरुवार अशा 4 दिवसात अंदाजे 600 फूट चढाई करताना
केवळ नऊ तासात (actual climbing hours) एकूण १० expansion बोल्ट्स, 11 फ्रेंड, 7 पिटोन, 2 पेग हि साधने वापरण्यात आली.
18/09/2025
"गिरीविराज हायकर्सची" २२० वी मोहिम नुकतेच गुटके (भांबर्डे) लोणावळा येथील "पाळणा "सुळके समूहापैकी चौथा सुळका चढाई करून यशस्वी झाली, हे संस्थेचे ७२ वे पावसाळी आरोहण होते.
रात्रीच सहा सहकान्यांची टिम कारने निघून पहाटे भांबर्डे येथे पोचली, थोडी विश्रांती घेवून सकाळी हॉटेल घनगड पायथा येथे चहा-नाष्टा आटोपुन सुळक्याचा पायथा गाठेपर्यंत साडेदहा वाजलेच. भुरू भुरु पाऊस आणि सोबतीला धुक्याची चादर ओढून परिसर भारून गेला होता..
जय्यत तयारी करुन ठिक ११ वाजता विशालने अजितच्या मदतीने प्रत्यक्ष चढाईस सुरूवात केली. योग्य ठिकाणी पहिलाच फ्रेंड वापरीत तो पुढे अग्रेसर झाला. मार्गातील रॉकपॅच मुक्त चढाई करीत त्याने पहिला टप्पा गाठला. इथे बऱ्यापैकी जागा होती. खालून सेकंडमैन अजित त्याच्यापाशी पोचताच अजितची जागा थर्ड मॅन कमलाकर यांनी घेतली. थांबलेली चढाई विशालने पुन्हा सुरु केली मार्गातील रॉकपॅचवर मात करण्यासाठी योग्य जागा शोधत त्याने दोन पिटॉन ठोकले व वरचा पॅच मुक्त चढाईचा निर्णय घेत अजितला सावध सुचना देत तो वरवर सरकु लागला, चढाई थोडी अवघडच दिसत होती पण येणाऱ्या प्रसंगास तोड देण्यास अजितही तयार होताच. स्क्रि व लुज रॉकवर समर्थपणे मात करीत विशालने सुरक्षित टप्पा गाठताच सर्वांनीच सुटकेचे निःश्वास सोडले..
आता वरची चढाई सहज आटोक्यात येणारी दिसत होती, तरीही पावसाळी व सावधगीरी या दोन्ही बाबींचे भान ठेवत त्याने वर जाता जाता मार्गात अजून दोन फ्रेंड वापरत (ठिक ११.३६) अवघ्या छत्तीस मिनिटांत माथा गाठत चौथी सुळकेगिरी यशस्वी केली. लागोपाठ क्रमाक्रमाने अजून पाच सहकाऱ्यांनी माथ्यावर प्रवेश करीत अगदी शंभर टक्के चढाई यशस्वी केली. इतरांची सावध उतराई होताच किरण व अजितने वाईंडअप सोपस्कार पूर्ण करीत अजून एका यशस्वी आरोहणाची सांगता केली.
किरण अडफडकरच्या नेतृत्वाखाली या मोहिमेत विशाल मोरे, अजित जाधव, कमलाकर सावंत, निंगेश शिवशरण, निलेश माईन सहभागी झाले होते...
23/08/2025
गिरीविराज हायकर्स डोंबिवलीची २१९ वी मोहिम नुकतेच घुटकेवाडी (भांबुर्डे -लोणावळा) येथील पाळणा सुळके समुहापैकी दोन सुळक्यांवर यशस्वी पावसाळी आरोहण करून पूर्ण झाली. एकूण चार सुळक्यांचा एकत्रीत समुह असणाऱ्या ह्या डोंगरावरील एक सुळका २७ जुलै रोजी आरोहण केल्यानंतर १५ ऑगस्टच्या मुहुर्तावर अजून दोन सुळक्यांवर सलग आरोहण करण्यात आले. हि संस्थेची ५१ वी पावसाळी सुळकेगीरी असून स्वातंत्र्यदिनी केलेले २० वे आरोहण होते.
पुण्या - मुंबईहून रात्री व भल्या पहाटे निघून दहा सहकाऱ्यांची टिम ठरलेल्या ठिकाणी एकत्रित येऊन पुढे सुळक्यांचा पायथा गाठण्यात आला. ठीक १२-३२ मि. राहुलने सर्व तयारीनिशी चढाई सुरू केली, तेव्हा हलके वारे व भुरु भुरु पाऊस अशी स्थिती होती. पहिलीच छोटीशी सोपी चढाई करीत त्याने मार्गात पहिलाच लहानसा फ्रेंड अडकवून त्याच्या आधारे वर सुमारे दहाएक फूट मुव्ह केली. इथून थोड उजवीकडे वळताना अवघडलेली चढाई सोडवताना त्याला चक्क दगडा वरील लहान लहान गवती बुध्यांचा आधार घ्यावा लागला. वर वर सरकत त्याने मार्गात अजून एक फ्रेंड वापरला. पुढील थोडी सोपी चढाई करीत वरच्या टप्प्यात पोहचल्यावर रॉकपॅचवरील क्रॅक मध्ये योग्य पिटॉन ठोकून तो वर सरकला. चढाई आटोक्यात आली होती. विजय काही क्षणांवरच होता, तरीपण सुरक्षेसाठी योग्य जागी तिसरा फ्रेंड अडकवून ठिक ०१.२२ मिनिटांनी माथा गाठीत राहुलने सुळक्याचे आव्हान संपुष्टात आणले, पाठोपाठ किरणनेही माथा गाठून त्यात भर घातली. वाईंडअपचे काम संपवून खाली उतरल्यानंतर शेजारच्या छोटेखानी सुळक्यावर विशालने चढाई करायला सुरवात केली. फोटोग्राफी करण्यासाठी याच सुळक्याच्या मध्यापर्यंत विदाऊट रोप चढून गेलेल्या विशालला फारसा प्रयास पडलाच नाही. उर्वरित सुळकाही दोराशिवायच चढून त्याने विजय साजरा केला.. त्याच्या पाठोपाठ अनिकेत, सुरज, मयुरेश यांनीही सावध चढाई करीत माथा गाठला..
किरण अडफडकर यांच्या नेतृत्वाखाली सदर स्वातंत्र्यदिन मोहिमेत राहुल शिंदे, अमर दरेकर, विशाल मोरे, सुरज भंडारे, मयुरेश घुडे, अनिकेत शिगवण, दिपीका दरेकर, अद्वेक दरेकर, भगवान दरेकर व सवीता दरेकर सहभागी झाले होते..
29/03/2025
Walk Of Hell
Grade : 6A A1
गिरीविराज हायकर्स ची 217 वी मोहीम नुकतेच 14 ते 16 मार्च या कालावधीत उंबर्डी (कुर्डूगड) परिसर येथील एका 200 फुटी अजिंक्य सुळक्यावर आरोहण करून पूर्ण झाली.
पाठीवर सुमारे 15 ते 20 किलोच्या सॅक लादून नदीच्या पात्रातले भले मोठे दगड धोंडे तुडवत सात जणांची टीम शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता उंबर्डी गावातून निघाली.
जीवघेण्या उकाड्याने पार हैराण करून सोडलं सर्वांना. तीन तासांचा ट्रेक चक्क सहा तासांवर पोहोचला, कसेबसे तीन वाजता बेस कॅम्प गाठला,चढाईचा सुळका व पाणी अगदी जवळच होते ही सर्वात सुखदायी गोष्ट होती.
थकलेल्या अवस्थेतही विशालने पाच वाजता सुळक्याची चढाई सुरू करत तासाभरात पन्नास फूट उंची गाठलीच त्या दिवशी. शनिवार उजाडतास किशोर आणि विशाल पुन्हा सुळक्यालाभिडले. मार्गात बोल्ट्स, पिटोन्स,फ्रेंड्स यांचा वापर करीत आजही शंभर फुटांचा पल्ला गाठण्यात आला. या मोहिमेत आमचं अजून एक काम वाढलं होतं ते म्हणजे पाणी उकळून पिणं ! गेल्यावर्षी ह्याच परिसरात अजिंक्य लिंग्या सुळक्यावरील चढाई दरम्यान सर्व मेंबर्सना डिसेंट्रीनं हैराण केलं होतं,सावधगिरी म्हणून ही खबरदारी घ्यावी लागत होती, सात मेंबर्स ने आजच्या दिवसात चक्क 30-35 लिटर पाणी उकळून पिण्याचा विक्रमच प्रस्थापित केला. ग्लोबल वॉर्मिंगचा तडाखा...
रविवार उजाडला आणि आजची निर्णायक लढाई लढण्यास किरण आणि विशाल पुन्हा एकदा सज्ज झाले,अमर आणि सुरज अनुक्रमे स्टेशन वन आणि टू वर आपापल्या जबाबदाऱ्या पार पाढत होतेच. विशालने सुरुवात केली थोडासा तिरकस मार्ग घेऊन पिटोन आणि फ्रेंड्स यांचं सुबक कॉम्बिनेशन सादत 11 वाजून 47 मिनिटांनी माथा गाठताच एकच जल्लोष झाला.गिरीविराजच्या शिरपेचात 217 वा मानाचा तुरा खोवला गेला,
किशोर मोरेच्या नेतृत्वाखाली या महत्त्वाकांशी मोहिमेमध्ये किरण अडफडकर, अमर दरेकर, विशाल मोरे,सुरज भंडारे,मयुरेश घुडे आणि प्रशांत पाटील सहभागी झाले होते. या मोहिमेत आठ एक्सपांन्शन बोल्ट 11 पिटोन व 16 फ्रेंड्स ही साधने वापरण्यात आली.
संस्थेतर्फे हा रूटला WALK OF HELL हे नाव देण्यात आले.
हे संस्थेचे 67 वे कृत्रिम आरोहण होते