26/05/2026
*अनपेक्षित असा गेट टुगेदर*
Batch 2004
भवानजी भाई शाळा
काल झालेल्या (काहींच आत्ता पण सुरूच आहे🤗🤗) गेट टुगेदर ची सुरुवात ची तयारी कोरोना काळाच्या आधी पासूनच सुरू होती पण योग येत नव्हता खूप प्रयत्न केले पण कुणाची तयारी दिसत नव्हती पण मनात एक शुद्ध इच्छा होती की गेट टुगेदर हा झालाच पाहिजे.. महेशकर सरांच्या भाषेत *Where there's a will, there's a way* म्हणून मी आशेवर होतो की तो एक दिवस येईल ज्या दिवस आपण सर्व बालमित्र भेटूच.
दर वर्षी विषय निघायचा चर्चा व्हायची आणि तसाच विषय संपून पण जायचा सोबत आपली आयुष्याची गाडी सुरूच होती... कधी आनंद कधी दुःख, कधी फायदा कधी तोटा हा सुरूच होता... कधी शाळेच्या रोड ने गेलो की परत जुन्या आठवणी जागृत व्हायच्या पण रिझल्ट आपल्या science च्या मार्क्स प्रमाणे *झीरो*..
मागच्या वर्षी पासून सरकारने आदेशच काढला की माजी विद्यार्थांच *स्नेह संमेलन हे झालच पाहिजे*
आदेशाची प्रत *संकेत* ने ग्रूप वर शेअर केली होती.
चला म्हटल या वर्षी पण होते का बघूया पण या वर्षी ची भयंकर परिस्थिती आता तर सर्वांनीच हात वर केले *एवढे वर्ष नाही जमल तर या वर्षी काय होणार* थोडा प्रयत्न करून बघितला आणि *सुभाष* आणि मी डायरेक्ट परमिशन साठी शाळेतच गेलो. परमिशन तर मिळणारच होती पण सर्व मूल येतील का हा मोठा प्रश्न आमच्या समोर होता पण सुरुवात तर करूया आणि बघूया काय होते तर... आणि एकदाची सुरुवात झाली...
आपला व्हॉट्स ऍप ग्रुप बनला, शाळेतून विद्यार्थांची यादी मिळाली आणि अशा प्रकारे सुरुवात ही झाली...
पण या सर्व तयारी साठी पूर्ण वेळ कोण देणार कारण सर्वांना आपली जॉब, घरच्या जबाबदाऱ्या या होत्याच त्या कडे दुर्लक्ष करू शकणार नव्हत... *पण गेट टुगेदर हे झालच पाहिजे हे आम्ही ठरवलं होतच*
या मध्ये *प्रेम* आणि *अमित* स्वतःहून पुढाकार घेऊन सुरू असलेल्या तयारीची रंगत आणि जोश वाढवला... दिवसभर आम्ही आमचे जॉब आणि काम करून late night कार्यक्रमाची तयारी करायचो...
या मध्ये आम्ही एकमेकांना कामाचे ऑर्डर द्यायचो ही गोष्ट खूप मला आवडली... मी तर एवढ्या मोठ्या पोस्ट वर आहों मी कशाला हे काम करू असे शुल्लक विचार आमच्या मनात सुद्धा आले नाही... रोज आमच्या मीटिंग कॉन कॉल सुरूच याची तयारी त्याची तयारी etc etc... या मध्ये आम्हाला 47 degree temp जाणवलच नाही. एक एक करून सर्व ग्रूप मध्ये जॉइन झाले मजा मस्ती सुरू झाली तेव्हा अस वाटायचं की *23 तारीख कधी येईल...* जास्तीत जास्त मूल गेट टुगेदर साठी कसे येतील याची प्लॅनिंग सुरू झाली पण या मध्ये आम्ही कुठे तरी कमी पडलो याची खंत राहील पण असो... कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू झाली होती कार्यक्रमाची रुपरेषा तुम्ही सर्वांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही तयार केली पण वेळेअभावी काही गोष्टी करता आल्या नाही जेवढ जमेल तेवढं करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तयारी दरम्यान काय काय घडलं आणि कार्यक्रमाची जागा कशी बदलण्यात आली हे सर्वांना माहित आहेच....
एका गोष्टीचा खूप आनंद होता सर्व या गेट टुगेदर साठी उत्साही होते. या तयारी साठी खूप महत्वाचा वाटा होता तो आपल्या *जयश्री मॅडम* चा. तिला जे जे काम सांगितले ते तिच्या व्यस्त shedule मधून वेळ काढून पूर्ण केले कधीही नाही म्हटल नाही... तिची शाळा सोबत जनगणना सोबत च कुटुंबाची जबाबदारी... कार्यक्रमच्या एक दिवस आधी आमची भेट झाली पण तो पर्यंत आमच फक्त फोनवर बोलणं...
आणि 23 तारीख उजळली.. आमच्या कडे अजून ही किती लोक येतील याचा आकडा नव्हता कार्यक्रम कसा होईल तयारी सुरू कुठून करायची याची धाकधूक होतीच... पण तुम्ही सर्व आले आणि आपला कार्यक्रम उत्तम झाला... आम्ही इकडे किती ही हातपाय मारले असते पण तुम्ही सर्व वेळ काढून आले नसते तर काही उपयोग नसता झाला... आपला कार्यक्रम फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांमुळे यशस्वी झाला याचे पूर्ण श्रेय सर्वांना जाते.... तुम्ही सर्व आलात आणि सर्वांनी आनंद घेतला त्या साठी *Thank you so much from bottom of the heart ❤️ ❤️*
कार्यकामध्ये काही चूक भूल झाली असेल तर क्षमस्व...
एक गोष्ट जाणवली की बाहेर आपल्याला सर्व *सर/मॅडम किंवा साहेब म्हणूनच आवाज देतात* पण इथे आपण आडनावणे ते पण शॉर्ट अस आवाज देत असू आणि आपल्या ला बिलकुल वाईट किंवा राग येत नव्हता... हीच आपल्या बालमित्र ची ओळख...
आपल्या आयुष्यात असंख्य मित्र असतील पण 10 वी पर्यंतच्या मित्रांची जागा कुणी ही घेऊ शकणार नाही हे नक्की..
काल पासून आपण enjoy करत आहों ते पैशाने विकत घेता येणार नाही हे सर्वांना कळून चुकलं. आपण खरंच काल 10 वी चे जीवन जगलो अस मला वाटते...
आपला जो ग्रुप तयार झाला आहे तो कधीच शांत राहिला नाही पाहिजे ही आपली सर्वांची जबाबदारी राहील.. आपण नेहमी एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होऊ अस आपण ठरवू.. कारण मित्र हे एक औषध आहे हे मी जेव्हा पासून तयारी सुरू तेव्हा पासून अनुभव घेत आहों..
तुम्हा सर्वांचे ग्रूप वर msges वाचून खूप भारी वाटते... आनंद होतो...
आपली अशी मैत्री कायम टिकावी आणि वर्षातून का होईना एक वेळ अवश्य भेटूया अस मला वाटते...
माझ्या भावना msg च्या स्वरूपात थोड्या जास्त झाल्या पण तेवढ्या तुम्ही वाचून घ्या असा आदेश राहील...
तुम्हा सर्वांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏