10/11/2025
श्री जगनगुरु व्यायाम शाळेतील कुस्तीगीरानी राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत एक सुवर्णपदक आणि एक कास्यपदक प्राप्त केल्याबद्दल चंद्रपूर जिल्ह्यासाठी गर्वाची बाब ठरली आहे. त्याकरिता भव्य मिरवणूक रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. तरी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व व्यायाम शाळेतील पदाधिकारी, व्यायामपटू, कुस्तीगीर, कुस्ती शौकीन मित्रांनी दोन्ही ही कुस्तीगीर पैलवानांना आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन व्यायाम शाळेच्या वतीने करण्यात येत आहे.