30/09/2026
🌾 ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची कृषि विज्ञान केंद्राला भेट
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) अंतर्गत आदित्य कृषी महाविद्यालय, बीड येथील चौथ्या वर्षातील १०५ विद्यार्थ्यांनी दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, अंबाजोगाई येथे भेट देऊन कृषि विज्ञान केंद्राची कार्यपद्धती व विविध प्रकल्पांची माहिती घेतली.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी यंत्र-अवजार सेवा केंद्र, अझोला उत्पादन, बंदिस्त शेळीपालन, फळबाग लागवड, गांडूळखत उत्पादन, पशुसंवर्धन, नैसर्गिक शेती, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन, रोपवाटिका, माती परीक्षण, जिवाणूखत उत्पादन, ड्रोन केंद्र आणि ग्रामोदय मार्केट हब आदी प्रकल्पांना भेट देऊन प्रत्यक्ष माहिती संकलित केली.
यावेळी आदित्य कृषी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. धनंजय सातपुते, डॉ. रामप्रसाद मुळे, डॉ. प्रवेश कुमार व डॉ. युवराज धावणे उपस्थित होते.
कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने श्री. सुहास पंके व डॉ. रवींद्र कोरके यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली.
📚 प्रत्यक्ष प्रक्षेत्र भेटीतून मिळणारे अनुभव हे कृषी शिक्षण अधिक व्यावहारिक आणि रोजगाराभिमुख बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.
#ग्रामीणकृषीकार्यअनुभव #कृषीशिक्षण #कृषिविज्ञानकेंद्र #अंबाजोगाई #कृषीविद्यार्थी #कृषीतंत्रज्ञान #बीड
Deendayal Research Institute Ministry of Agriculture & Farmer’s Welfare, Government of India Icaratari Pune Indian Council of Agricultural Research Collector Office Beed - जिल्हाधिकारी कार्यालय बीड Shivraj Singh Chouhan सहाय्यक कृषि अधिकारी